पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार   

क्वेटा : पाकिस्तानच्या अशांत क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणार्‍या वाहनाजवळ शुक्रवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात चार सैनिक ठार तर तीन जण जखमी झाले. स्थानिक पोलिस प्रमुख नवीद अहमद यांनी ही माहिती दिली. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी प्रांतासह देशाच्या इतर भागात सुरक्षा दल आणि नागरिकांना वारंवार लक्ष्य करणार्‍या बलूच फुटीरतावाद्यांवर संशय येण्याची शक्यता आहे. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे. 
 
बलूचिस्तान हे पाकिस्तानात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या बंडखोरीचे ठिकाण आहे. अमेरिकेने २०१९ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह अनेक फुटीरतावादी गटांनी या ठिकाणी हल्ले केले आहेत. 

Related Articles